Rule Change: नवीन वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार! 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू December 30, 2024 by Ajay Rule Change : नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. नवीन वर्षात वाहनांच्या किंमतीपासून ते सोने-चांदीच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. येत्या वर्षात ऑनलाइन पेमेंट ते अगदी क्रेडिट कार्डपर्यंतचे नियम बदलणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र महागाईचा सामना करावा लागू शकतो. (Rule Change) वाहनांच्या किंमती वाढणार भारतातील कार कंपन्यानी उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. ह्युंदाईने २५,००० रुपयांपर्यंत तर महिंद्रा, मर्सिडीजने ३ टक्के किंमती वाढवल्या आहे. वाहनांचे पार्ट्स महाग झाल्याने या किंमती वाढल्या आहेत. 1 जानेवारी पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर? लक्झरी वस्तूंवर टिसीएस लागणार आता तुम्हाला हँडबॅग, महागड्या वस्तू, १० लाखांपेक्षा जास्त किंमतीवर घड्याळांवर टिसीएस भरावा लागणार आहे. तुम्हाला १ टक्के टिसीएस भरावा लागणार आहे. (Rule Change From 2025) UPI पेमेंटची लिमिट येत्या वर्षात यूपीआय पेमेंटची लिमिट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 123Pay सेवेद्वारे यूपीआयची लिमिट ५०,००० ते १०,००० रुपयांपर्यंतची करण्यात आली आहे. सोने-चांदी महागणार येत्या वर्षात सोने-चांदीचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव ८५ हजारांपर्यंत जातील, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोने-चांदीचे भाव वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. दुचाकी चालकांवर बसणार दंड १ जानेवारी पासून नवीन नियम लागू रेशन कार्डचे नियम रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. बनावट रेशन कार्ड बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नवीन वर्षात त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांची ई-केवायसी केली जाणार आहे. 1 जानेवारीपासून ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द अपात्र यादी जाहीर